Header Ads Widget

बेटावद येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन


बेटावद प्रतिनिधी.

 बेटावद येथील महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम श्री.फ. मु. ललवाणी माध्यमिक व डॉक्टर दादासाहेब श्री तू गुजर उच्च माध्यमिक विद्यालय बेटावद येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महान व्यक्तिमत्त्वाला सामूहिक अभिवादन करून करण्यात आली.

यावेळी अॅड. दिलीप वाघ, विलास महाले,मुख्याध्यापक डी. जी. पवार सर, प्राथमिक मुख्याध्यापक एस. पी. माळी , ए. जी. मोरे , श्री एम व्ही जमदाडे तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बाबासाहेबांच्या समाजजागृती, शिक्षणप्रेम आणि संविधाननिर्मितीतील योगदानाचा उल्लेख करत त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांनीही बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भाषणे आणि सांस्कृतिक सादरीकरण करून कार्यक्रमाला विशेष स्वरूप दिले.

कार्यक्रमाचे संयोजन शिक्षकवर्गाने केले असून उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या आदर्शांचे पालन करण्याचे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments