**दोंडाईचा येथील सम्राट अशोका कॉम्बेट मार्शल आर्ट संचलित सम्राट अशोका क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंचा सत्कार रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स व भारतीय जनता पार्टी दोंडाईचा यांच्या माध्यमातून रोटरी भवन येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सचे अध्यक्ष भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन रोटरी सिनियर्सचे सचिव डॉ अनिल धनगर डॉ अनिकेत मंडाले नगरसेवक जितेंद्र गिरासे इ मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे नुकत्याच पार पडलेल्या नंदुरबार जिल्हा मोंटेक्स बॉल क्रिकेट असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय मॉन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात दोंडाईचा क्रिकेट संघाने कास्य पदक व तृतीय स्थान मिळवीत चषक पटकावला तसेच राष्ट्रीय ओपन युथ गेम्स देवास येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट संघ म्हणून ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आले या क्रिकेट खेळाडूंच्या यशामुळे संपूर्ण क्रिकेट टीमच्या व जुडो कराटे मध्ये यलो बेल्ट पास झालेल्या मार्शल आर्ट खेळाडू कनिष्का राजपूत ,यशिका महाजन ,प्राजक्ता भदाणे व क्रिकेट खेळाडू क्रिकेट कॅप्टन महिपाल राजपूत ,विराट दयेकर, सुमित गिरासे, जयेश धनगर, अदित राजपूत, नावेद बेलदार, द्रुपल प्रजापती ,सिद्धेश सोनार, सिद्ध सरवैय्या , अजिंक्य तेटे , प्रियांश राजपूत , जैनित कुकरेजा, अनस शेख , मयंक अडगाळे, लक्ष अडगाळे इ विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व मोमेन्टो प्रदान करण्यात येऊन सत्कार करण्यात आला भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांनी प्रोत्साहन पर भाषणात सांगितले की खेळ हा जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे यातून आपण शारीरिक मानसिक बौद्धिक विकास करू शकतो यानंतर नेहा महाजन, यशिका महाजन, कनिष्का राजपूत, प्राजक्ता भदाणे यांनी जुडो कराटेचे आत्मरक्षा डावपेच करून दाखविले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हितेंद्र राजपूत सर यांनी केले तर आभार डॉ. जितेंद्र भदाणे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अकॅडमीचे क्रिकेट प्रशिक्षक राजवर्धन भदाणे व चिराग पवार यांनी विशेष सहकार्य केले *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा*.
0 Comments