Header Ads Widget

गटनेतेपदी श्रीमती वंदना परमार तर मनोहर पाटील प्रतोदपदी


प्रतिनिधी l शिंदखेडा : शिंदखेडा भाजपा नगर पंचायत गटनेतेपदीविद्यमान नगरसेविका श्रीमती वंदना चेतनसिंह परमार यांची सर्वानुमते निवड झाली. भाजप प्रतोदपदी नगरसेवक मनोहर गोरख पाटील यांची निवड करण्यात आली. ही निवड महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली
दोंडाईचा येथील जय पॅलेस मधील
आमदार कार्यालयात नगर पंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक दि २७ डिसेंबर शनिवारी सकाळी ११ वाजता झाली.
    या बैठकीत मंत्री जयकुमार रावल,जिल्हा सरचिटणीस डी एस गिरासे,नव-निर्वाचित नगरसेवक व माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमती रजनी वानखेडे, माजी गटनेते अनिल वानखेडे तसेच भाजपचे ११ नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानुसार श्रीमती वंदना परमार यांची गटनेतेपदी तर मनोहर पाटील यांची प्रतोदपदी, मुख्य समन्वयक उदय देसले व नगर पंचायत प्रवक्ता सुयोग भदाणे यांची निवड करण्यात आली. सर्व उपस्थितांनी या निर्णयाला मान्यता दिली.भाजप जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, शिंदखेडा शहाराध्यक्ष संजयकुमार महाजन यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments