Header Ads Widget

उधना शिरपूर बस कंडक्टर ची अरेरावी

 शिंदखेडा प्रतिनिधी उदना शिरपूर या बस मधील कंडक्टरने अरेरावी करून पत्रकार मुरलीधर महाजन यांना पोलीस स्टेशनला येण्याची धमकी दिली 
    सविस्तर माहिती अशी की मालपुर दोंडाईच्या येथील पत्रकार मुरलीधर महाजन हे आपल्या दुचाकी वाहनाने शिंदखेडा येथे मोटरसायकलने येत असता बस क्रमांक एम एच 14 बीटी    18 31 बस मधून कोणीतरी खिडकीतून बाहेर थुंकल्याने मोटरसायकलवर प्रवास करणारे व्यक्ती मुरलीधर महाजन यांच्या चेहऱ्यावर उडल्यामुळे त्यांनी बस पुढे जाऊन थांबवली म्हणून तपास केला असता बस कंडक्टरने प्रवाशांना समज न देता मुरलीधर महाजन यांनाच पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करण्याची धमकी दिली व त्यांच्या जवळील पत्रकार म्हणून असलेले ओळखपत्र  हिसकावून घेतले एवढी अरेरावी करणारे कंडक्टर कोण याची चौकशी व्हावी अशी मागणी वाईस ऑफ मीडिया शिंदखेडा तालुक्यातर्फे शिंदखेडा बस स्थानक आगार प्रमुख शिवदे यांच्याकडे फोन द्वारे केली सदर उधना शिरपूर बस हे शिरपूर डेपोची असल्याची माहिती प्राप्त झाली . शिरपूर डेपोचे कंडक्टर व ड्रायव्हर हे नेहमीच प्रवासी असो अथवा इतर कोणीही यांच्याशी सातत्याने अरेरावी करतात सदर बसचे कंडक्टर कोण याबाबत शिरपूर बस स्टॅन्ड एटीएस व आगार व्यवस्थापक यांनी या तक्रारीची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे व हिसकावलेले ओळखपत्र शिंदखेडा डेपो मॅनेजर यांच्याकडे जमा करावे

Post a Comment

0 Comments