अमळनेर -मुंबई येथे 21 जानेवारी 26 रोजी एसटी आरक्षणासाठी उपोषणाला समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी धनगर आरक्षणाचे लढाऊ नेते दीपक बोराडे यांनी मार्गदर्शन केले .एसटी आरक्षणसाठी समाजाने एक संध व संघटित राहावे. धनगर समाजाला संविधान नुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलन सुरू असून ही लढाई आता निर्णायक टप टप्प्यावर आली आहे असे प्रतिपादन एसटी आरक्षणाचे प्रवर्तक दीपक भाऊ बोराडे यांनी शिव पेट्रोल पंप हाॅल स्टेशन रोड अमळनेर येथे आयोजित कार्यक्रमात केले. आरक्षणाच्या विषयावर बोलताना दीपक बोराडे म्हणाले राज्यात आरक्षणासाठी अनेक समाजांनी संघर्ष केला आहे मात्र धनगर समाजातील अज्ञान व भोळेपणामुळे समाजाला खरा मित्र ओळखता आला नाही .राजकारणी मात्र चतुर व धूर्त असून समाजाने आज पर्यंत मोठ्या प्रमाणावर पैसा व वेळ खर्च केला . समाजासाठी अनेक ठिकाणी आंदोलन झाली परंतु आता ही आरक्षणासाठी शेवटची व निर्णायक लढाई आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास समाजातील सर्व घटकांचे कल्याण होणार असून हे आरक्षण पूर्णपणे घटनात्मक हक्कावर आधारित आहे. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले होते .मात्र अद्याप प्रत्यक्षात ते मिळाले नाही त्यामुळे येणाऱ्या काळात समाजाने एकसंध राहून ताकदीने संघर्ष करणे आवश्यक आहे. सरकारने धनगर समाजाची दखल घेऊन तात्काळ आरक्षण द्यावे अन्यथा समाजाला पुढील भूमिका ठरवावी लागेल असा इशारा त्यांनी दिला .यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुयोग धनगर, सुवर्णा धनगर, दीपक चौगुले यांचा सत्कार करण्यात आला . तसेच अर्बन बँकेचे संचालक मोहन भाऊ सातपुते .कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक समाधान भाऊ धनगर यांच्याही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष व धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी केले.त्यांनी समाजाची झालेली पिछेहाट मांडत समाजाने एकत्र राहून नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले .तसेच एकीचे बळ हे समाजाचे खरे सामर्थ्य आहे असे त्यांनी सांगितले .राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष एस.सी. तेले सर यांनी आरक्षणाचे लढाऊ नेतृत्व बोराडे यांना समाजाने शक्ती द्यावी व सर्व समाज बांधवांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जी एल धनगर सर यांनी केले आभार प्रदर्शन चेतन देवरे यांनी केले. यावेळी काँग्रेस सेवादालचे तालुकाध्यक्ष व मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा साहेब बन्सीलाल भागवत , माजी उपनगराध्यक्ष मोहन भाऊ सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान भाऊ धनगर, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेलचे तालुका अध्यक्ष एस. सी .तेले. सर, दिलीप खांडेकर, प्रा. जी एल धनगर ,देवा भाऊ लांडगे, गोविंद कंखरे, प्रदीप भाऊ कंखरे, मुख्याध्यापक आनंदा हडप सर, चंद्रकांत कंखरे सर ,नगरसेवक सुयोग धनगर ,नगरसेविका सुवर्णा धनगर, तुळशीराम धनगर, चेतन देवरे, दिलीप ठाकरे,शांताराम ठाकरे ,नामदेव ठाकरे, परशुराम ठाकरे ,सौरभ भागवत ,प्रा. दिनेश भलकार, ए बी धनगर सर,प्रा. मनोज रत्नापारखी , प्रा. दीपक पवार ,निखिल बोरसे, मनोज मोरे, प्रीतम रत्नपारखी सर, त्र्यंबक बच्छाव ,अनिल बागुल, पंकज धनगर ,तुषार धनगर ,लक्ष्मण धनगर चेतन पाटील ,फकीरा पाटील ,पत्रकार ईश्वर महाजन ,पत्रकार उमाकांत ठाकूर उपस्थित होते
0 Comments