Header Ads Widget

कंचनपूर येथील शेतकऱ्यांच्या वीज तारांवर डल्ला,वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल, वीज मंडळ सुस्त.


डोंगरगाव (प्रतिनिधी)

प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि वीज मंडळाच्या उदासीनतेचा फटका डोंगरगाव शिवारातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बसला आहे बुधवार, दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी डोंगरगाव शिवारात वीज तारांची पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. महिनाभरापूर्वीच अशीच चोरी झाली असतानाही, प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे चित्र दिसत आहे
डोंगरगाव शिवारातील गट क्रमांक १४६, १४७ आणि १४८ मधील वीज तारांचे एक नव्हे दोन नव्हे तब्बल १७ गाळे अज्ञात चोरांनी लंपास केले आहेत यामध्ये शेतकरी मधुकर दगा पाटील, निलेश दिलीप पाटील, ईश्वर धोंडू कोळी आणि नंदकिशोर भिकन पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या चोरीमुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

जुनी तक्रार धूळ खात; प्रशासनाची निष्क्रियता
विशेष म्हणजे, याच शिवारात महिनाभरापूर्वी देखील वीज तारांची चोरी झाली होती त्या वेळी नरडाणा पोलीस स्टेशन येथे  रीतसर तक्रार दाखल केली होती मात्र, तक्रार देऊनही आजतागायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही किंवा घटनास्थळाची साधी पाहणीही करण्यात आली नाही वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाची उदासीन व निष्क्रिय भूमिका उघड होत आहे

रब्बी हंगाम धोक्यात; जबाबदारी कोणाची?
सध्या रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झाली असून पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे अशा वेळी वीज तारांची चोरी झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे जर पिकांना पाणी मिळाले नाही आणि पिकांचे नुकसान झाले, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत

शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डोंगरगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments