शहादा
स्काऊट गाईड शिबीरातून आत्मविश्वास, जीवनाचे कौशल्य,संस्कार,समाजसेवा, नेतृत्व गुण, आपत्कालीन परिस्थितीचा सामना आणि निसर्गाशी जुळवून घेण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शिबीरातून मिळत असते असे प्रतिपादन स्काऊट गाईड शिबिराचे अध्यक्ष व संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव यांनी केले.तसेच
आपल्या अंगी मेहनत व जिद्द राहिलीतर आपण परीस्थितीवर मात करुन मंजिल गाठू शकतो.असे शहादा आगाराचे स्थानक प्रमुख प्रविण पाटील यांनी स्काऊट शिबीराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी आपल्या मनोगतात सांगितले.
वंसतराव नाईक शाळेच्या क्रीडा प्रांगणात स्काऊट शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव प्रा.संजय जाधव तर उद्घाटक शहादा आगाराचे स्थानक प्रमुख प्रविण पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव व जिल्हा स्काऊट गाईड वर्षा जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र सुरवाडा वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्निल पाटील,अभिनव खांदेश वृत्तपत्राचे संपादक प्रभाकर सुर्यवंशी,शहादा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा.नेत्रदिपक कुवर आदि होते तसेच,शाळेचे मुख्याध्यापक एम बी मोरे, उपमुख्याध्यापक जे एम पाटील, उपप्राचार्य जे बी पवार, पर्यवेक्षक ए डी खेडकर,ए ए खान व सर्व स्काऊट शिक्षक उपस्थित होते.
स्काऊट शिबीरात स्काऊट विद्यार्थ्यांची पाच संघात उभारणी करण्यात आली होती.प्रत्येक संघाचे संघ प्रमुख व त्या संघातील स्काऊट सदस्यांनी आपापला तंबू सजविलाला होता.त्यात ओला कचरा सुका कचरा,गाठीप्रकारसाठी दो-या, जख्मीसाठी नेण्यासाठी स्ट्रेचर आदी वस्तू बनवून आपला तंबू उत्कृष्ट सज्ज कला.होता.शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर ध्वजारोहण, प्रार्थना, झाल्यानंतर मान्यवरांनी गरुड संघ, मयूर संघ,राजहंस संघ,सिंहसंघ,अश्वसंघ या पाचही तंबूंचे निरीक्षण केले.या तंबू निरीक्षणात प्रथम आलेल्या तंबूच्या सदस्यांना वार्षिक पारितोषिक समारंभात बक्षिस दिले जाते.
दुपार सत्रात धुळे येथील स्काऊट शिक्षक रमेश पावरा यांनी बौद्धिक सत्रात स्काऊटांना मार्गदर्शन केले.त्यानंतर मनोरंजनाचे, शेकोटी गीत व स्वच्छता करण्यात आली.शिबिराची माहिती प्रस्तावणा पावरा व्हि एस यांनी तर सूत्रसंचालन मुंजाळ एस के यांनी केले.शिबीर यशस्वीतेसाठी स्काऊट शिक्षक तेलगोटे ए एच,जाधव पी एम,शेवाळे एन एल,कापसे आर डी.याच्यासह सह शिक्षक तांबोळी डी डी,खेडकर भावेश,जगताप बी डी ,चौधरी एन आर आदींनी परीश्रम घेतले.
0 Comments