निरगुडी (ता. शिंदखेडा) — महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊरावल यांच्या वाढदिवसानिमित्त निरगुडी येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात तब्बल 52 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
याचवेळी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये शुगर, थायरॉईड, रक्तदाब (बीपी) आदी तपासण्या व उपचार करण्यात आले असून जवळपास 400 पेक्षा अधिक नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ
घेतला. या सामाजिक उपक्रमानिमित्त नागरी सत्कार कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बापूसो डी. आर. बोरसे (माजी जिल्हा परिषद सदस्य), बापूसो देविदास रामदास कोळी, शिंदखेडा येथील गटनेते चेतन भाऊ परमार, पूर्ण नगरसेवक व पंचायत समिती सदस्य विशाल पवार यांची उपस्थिती लाभली. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अमोल भाऊ राजपूत (भाजपा तालुका सरचिटणीस, शिंदखेडा ग्रामीण) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच, अमोल भाऊ युवा मंचचे कार्यकर्ते व सर्व नेतेगणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
0 Comments