Header Ads Widget

तब्बल ३३ वर्षांनी भेटले शालेय जीवनातील सवंगडी


प्रतिनिधी l शिंदखेडा : क्षण सोनेरी आठवणींच्या, शाळेच्या दारी भेटलो पुन्हा, वाटलं काळ थांबला जणू, पुन्हा बालहोत चाललो आम्हीना…या उक्तीप्रमाणे काळ बदलला, चेहरे बदलले, जबाबदाऱ्या वाढल्या; पण शालेय मैत्रीचं नातं तसूभरही बदललं नाही. अगदी याच भावनेने १९९२-९३ साली दहावी उत्तीर्ण झालेले भडणे येथील कै सी बी देसले विद्यालयाचे विद्यार्थी तब्बल ३३ वर्षांनंतर दि ११ जानेवारी रविवारी पुन्हा एकवटले आणि जुने दिवस आठवत एक अविस्मरणीय स्नेहमेळावा साजरा केला. ज्या शाळेत बालपण साकारले, जे प्रांगण खेळण्यांनी, आनंदाने भरून गेलं, त्याच जागी पुन्हा जमल्यावर आनंद, उत्साह, ओलावा आणि हुरहुर अशा अनेक भावना मनात दाटून आल्या. वर्गखोल्या, शाळेचे मैदान आणि त्या काळच्या खोडकर व निरागस आठवणींनी सर्वांना भूतकाळात नेले.प्रत्येक क्षण हास्य उत्साह आणि मैत्रीने भारवलेला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित तत्कालीन सर्व शिक्षक गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तूही सुपूर्द केली.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करून मान्यवरांचे स्वागत दहावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय समिती चेअरमन भबुतराव उत्तमराव देसले यांनी भूषविले.प्रमुख अतिथी म्हणून डॉ प्राचार्य एस एन करंके,माजी मुख्याध्यापक जी आर पाटील,ए व्ही निकम, बाजीराव पाटील,भाजपा शिंदखेडा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, श्रीमती मंगला बोरसे, सुरेखा महाले, कल्पना चव्हाण,अलका सूर्यवंशी, मीनाक्षी वाडिले,डॉ निलेश देसले,विठ्ठल खरकार, तुळशीदास भामरे आदींनी उपस्थिती दिली. 
    दरम्यान, भूतकाळात डोकावत आज पुन्हा बालपणाचा, मैत्रीचा क्षण अनुभवायला मिळाला आयुष्यातील हा दिवस प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात घर करून राहील या भावनेने सर्वानी निरोप घेतला.या कार्यक्रमासाठी मुंबई स्थित डॉ निलेश देसले,विजय पाटील,संजय मंगळे यांच्यासह स्थानिक मित्रानी विशेष परिश्रम घेतले. मुंबई येथील वेद फाउंडेशन यांच्यामार्फत स्मृतिचिन्ह, भेटवस्तू, शाल व श्रीफळ देण्यात आले.प्राचार्य डॉ एस एन करंके यांनी शाळेच्या विद्यार्थी विकास मंचासाठी दहा हजार व १० वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थीस एक हजार रुपये रोख घोषित केले.श्रीमती अर्चना पाटील यांनी शाळेला भेटवस्तू दिली.सारंग पाटील,संजय मंगळे व श्रीमती अर्चना पाटील यांच्या सूत्रसंचलणाने रंगत वाढली.
कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा भेटू या अशा निर्धाराने आणि मनात अनंत आठवणींचा खजिना घेऊन सर्वांनी एकमेकांना निरोप दिला.आभार डॉ निलेश देसले यांनी मानले

 कार्यक्रम प्रसंगी १९९२ च्या बॅचमधील यांनी दिली उपस्थिती :  डॉ निलेश देसले,प्रशांत पाटील, मनोहर पाटील, प्रेमराज पाटील,दत्तात्रय बागुल, अधिकार पाटील, सतीश पाटील, सजन मंगळे,संजय मंगळे,महेश पाटील,पोपट पाटील,विजय पाटील,मुकेश पाटील, दीपक चव्हाण तसेच श्रीमती अर्चना पाटील,सुरेखा देसले,आशा पाटील,सुवर्णा सोनार,कोकिळा सैंदाणे, सुवर्णा पाटील, कल्पना पाटील,पिंगला गिरासे, शालू मंगळे आदी

Post a Comment

0 Comments