Header Ads Widget

*जनता हायस्कूल मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी*

 *शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व युवकांचे प्रेरणास्थान असणारे धर्म प्रचारक स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली* 
    *कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक श्री बी जे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षिक श्री डी एच सोनवणे,श्री एस ए पाटील,श्री एस के जाधव, श्री जे डी बोरसे,श्री बी एन मोरे,वरिष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते* 
  *कार्यक्रमाचे औचित्य साधून  राष्ट्रमाता जिजाऊ  यांच्या जीवनचरित्राची तसेच त्यांचे स्वराज्यासाठीचे योगदान या विषयावर उपशिक्षिका श्रीमती आर ए पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रास्ताविकातून माहिती दिली.* * 
  *स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्मासाठी केलेल्या कार्याचा तसेच त्यांच्या जीवनातील अनेक मार्गदर्शक कथा बारावी विज्ञान वर्गाचे विद्यार्थिनी कु.श्रुती यादवराव मराठे हिने विद्यार्थ्यांन समोर मांडली .* 
         *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री जे डी बोरसे यांनी मानले*

Post a Comment

0 Comments