Header Ads Widget

*शिंदखेडा नगरपंचायत सभागृहात महाराष्ट्रातील पहिला जनता दरबार*. 👉*शहरातील नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी खुले व्यासपीठ*. 👉*समस्या व तक्रारी साठी तक्रार पेटी टोल फ्री हेल्पलाईन चे नगराध्यक्षा कलावती माळी च्या हस्ते अनावरण*

                         
शिंदखेडा {यादवराव सावंत) प्रतिनिधी :- शहरातील पाणी, गटार व रस्ते या प्रश्नांची उकल करण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील आहे. शहरात नागरिकांना दोन तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न नगरपंचायतीचा आहे. यासाठी नगरपंचायत प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे. शहरात कोणत्याही भागात समस्या असल्यास नगरपंचायतीच्या '१८००२३३००३२' या हेल्पलाइन क्रमांकावर नागरिकांनी संपर्क करावा,तसेच तक्रार पेटीत आपल्या तक्रारी टाकाव्यात असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी यांनी केले. शिंदखेडा शहरातील नगरपंचायत ने घेतलेल्या जनता दरबार हा महाराष्ट्रात एकमेव उपक्रम असावा अशी चर्चा होती. हया माध्यमातून शहरातील नागरिकांनी महिलांसह मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपल्या समस्या, तक्रारी, अडचणी बिनधास्त  मांडल्यात. जनता दरबाराचा सभागृह हाऊसफुल झाला होता.
नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नगरपंचायतीच्या महात्मा फुले सामाजिक सभागृहात आयोजित पहिल्या जनता दरबारात सर्व तक्रारीचे तात्काळ निराकरण अधिकारी, कर्मचारी मार्फत सोडवु असे कलावती माळी बोलत होत्या. या वेळी गटनेते राकेश माळी, नगरसेविका रजूबाई सुभाष माळी, कमलबाई रविद्र पाटोळे, पुष्पा गोपाळराव सोनवणे, सुभाष माळी, अर्जुन भील, प्रशासकीय सचिन वाघ, पाणीपुरवठा अधिकारी विपुल साळुंखे,आरोग्य विभागाचे वरुणकुमार, अभियंता अमरदीप गिरासे,प्रा. दीपक माळी, मनीष माळी, राहुल सोनवणे, गणेश सोनवणे, निलेश पाटील, एड. निलेश देसले, दिलीप पाटील, गजेंद्र भाभरे, तालिब नोमानी उपस्थित होते.
जनता दरबारात शहरातील नागरिकांनी पाणी, रस्ते व गटारी, आरोग्य व स्वच्छता यासंबंधी असलेल्या समस्या मांडल्या. भगवा चौक व शिवाजी चौफुली हया ठिकाणी महिलासाठी शौचालय नसुन त्याची तात्काळ करा हयासाठी रोहित कौठळकर यांनी वेळोवेळी आंदोलन निवेदन दिले होते. तसेच बी. के. देसले नगर मधील तिन्ही लाईन च्या गटारी तुंबलेल्या आहेत यासह हीच परिस्थिती बरेच प्रभागात असल्याच्या तक्रारी सादर केल्या.संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले. शहरांमध्ये दोन तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न नगरपंचायतीचा असून,याबाबत कोणतेही राजकारण करू नये व विरोधकांनी देखील या प्रयत्नाला साथ द्यावी. शहरात चुकीच्या पद्धतीने झालेले पाणी योजना, गटारी व रस्त्यांच्या कामांचे चौकशी करण्यात येऊन संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा देखील या जनता दरबारात देण्यात आला.
आगामी पाच वर्षात होणाऱ्या विविध विकासकामांबाबत पारदर्शकता ठेवण्यात येईल. तसेच कामे चांगल्या एजन्सीला देण्यात येतील.
मात्र, यासाठी काही कालावधी जाणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नगरपंचायतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्या व्यक्तीचे काम तात्काळ व्हावे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यास गंभीर दखल घेण्यात येईल, असेही माळी यांनी सांगितले. नगरपंचायत कार्यालयाबाहेर नागरिकांसाठी ठेवण्यात आलेल्या तक्रारपेटी व टोल फी हेल्पलाईन क्रमांकाचे उद्घाटन नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या हस्ते करण्यात आले.गटनेते राकेश माळी व सर्व राष्ट्रवादी चे नगरसेवक उपस्थित होते.
 *कचरापेटी मिळणार भेट* 
शिंदखेडा शहरात घरपट्टी व पाणीपट्टी थकीत असल्याचे प्रमाण अधिक असले तरी जो व्यक्ती घरपट्टी व पाणीपट्टी दरवर्षी नियमितपणे भरेल अशा व्यक्तींना नगरपंचायतीतर्फे प्रमाणपत्र व एक कचरापेटी भेट देण्याच्या योजनेची घोषणा जनता दरबारात करण्यात आली. सुत्रसंचलन प्रा. दिपक माळी व सुभाष माळी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments