Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकतीच "राजमाता जिजाऊ" व "स्वामी विवेकानंद"(राष्ट्रीय युवा दिन)जयंती मोठ्या उत्साहात साजरा

सुजाण नागरिक प्रतिनिधी श्री.सी.जी.वारूडे
        शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकतीच "राजमाता जिजाऊ" व "स्वामी विवेकानंद"(राष्ट्रीय युवा दिन)जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्या.
       यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय उपमुख्याध्यापक श्री .पी.आर पाटील व प्रमुख पाहुणे आबासो.श्री.एस.ए.कदम होते यांनी प्रथमतः स्वराज्य जननी, राष्ट्रमाता,राजमाता आदरणीय आईसाहेब जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद दोघा महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
     त्यानंतर विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर भाषणं केली नंतर विद्यालयातील शिक्षकांनीही माॅ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंदजी यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केलेत.
         तद्नंतर शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बाळासाहेब श्री.पी आर पाटील सर व प्रमुख पाहुणे-आदरणीय आबासाहेब श्री एस.ए.कदम यांनी युवकांचे प्रेरणास्रोत असलेले प्रख्यात आध्यात्मिक गुरू युगपुरुष यांच्या नावांविषयी- वीरेश्वर,नरेंद्र, स्वामी विवेकानंद इ.नावांचा बोध करून भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले व 
"ज्ञानातून वक्तृत्व उगम पावते व परिश्रमानंतर लाभणारी विश्रांती फार मधुर असते", तसेच 
"जे काही कराल ते मनःपूर्वक एकाग्रता करून करा म्हणजे मग तुम्ही चुकणार नाही"! व "युवा "या शब्दोच्चार विषयीचे दाखले देऊन महत्त्व पटवून दिले.
       त्यानंतर स्वराज्य जननी, राष्ट्रमाता, राजमाता आदरणीय "जिजाऊ आईसाहेब "या मायेनं छत्रपती शिवाजी महाराजांना  रामायण, महाभारत, साधु संत, ऋषीमुनीवर विषयी गोष्टी व शिवाजी महाराजांच्या अंगीकार असलेले गुणांचे वर्णन करताना व्यक्त केलेत त्यात- दूरदृष्टी,प्रेम, खेळ, व्यवहार चातुर्य,
अन्यायाविषयीचीड, युद्ध कला, कर्तव्य ताप्तरता, कर्तव्य निष्ठा, राष्ट्रनिष्ठा,त्यागआदी गुणांचे सुसंस्कृतपणा केवळ "माँसाहेब जिजाऊंनी केलेत इ.विषयीचे मर्म पटवून दिलेत व त्रिवार असावा मानाचा मुजरा त्या मातेला जिने घडवला राजा रयतेचा रचली स्वराज्याची गाथा.दैवत असे ती राजमाता "जिजाऊ"जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
      यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी-पालक वर्ग,शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.या कार्यक्रमाचे
  सूत्रसंचालन-श्री एस.बी.भदाणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन- श्री.एम.एस पाटील सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता "वंदे मातरम्"या राष्ट्रीय गीताने करण्यात आले.

Post a Comment

0 Comments