दिनांक -२२/०१/२०२६ गुरुवार
सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री.सी.जी.वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकतीच आरोग्य विषयक सिकलसेल तपासणी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकतीच प्राथमिक आरोग्य केंद्र वालखेडा अंतर्गत इयत्ता ०५ ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची "सिकलसेल" ॲनिमिया तपासणी करण्यात आली; या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे शिक्षक मा.बाळासाहेब श्री.पी.आर.पाटील सर व प्रमुख पाहुणे - आदरणीय आबासाहेब मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम सर,व मा.डॉक्टर जयश्री पाटील व वैद्यकीय सहकारी सोनवणे नाना व आशा सेविका श्रीमती मनीषा कदम, सौ.शितल पाटील होते.
यावेळी मा.डॉ.जयश्री पाटील व मा.श्री.पी.आर.पाटील व मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब(संदेशवहन)आदिंनी आरोग्य विषयक महत्त्वपूर्ण माहिती पटवून देताना सांगितले की, आरोग्य हे एक धनसंपदा सारखे आहे त्यासंबंधी काळजी घेतली पाहिजे कारण आपल्या शरीरातील रक्तातील प्रमाण कमी होऊन पेशी कमी करणारा गंभीर असलेला "सिकलसेल" आरोग्य तपासणी करण्यात येत आहे त्यासाठी दैनंदिन जीवनातील नेहमी उकळून भरपूर पाणी पिणे, योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, वेळेवर झोप घेणे, तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत महत्त्व उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिलेत.
यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी व डॉक्टर जयश्री पाटील व वैद्यकीय सहकारी सोनवणे नाना व आशा सेविका
श्रीमती मनीषा कदम,सौ.शितल पाटील उपस्थित होते.व...
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी- श्री.एस.एस.पाटील,श्री.सी.जी.वारूडे,
श्री.आर.बी.गवळे, श्रीमती बी.जे.कदम,
महेश पाटील,जे.एस.कदम,एम.वाय.पाटील,
पी.एस.सिसोदे,डी.डी.कदम,पी.डी.खोंडे
यांनी परिश्रम आदिंनी घेतले.
0 Comments