आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा - रोटरी दीप्स - सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल - उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा आयोजित कै.सौ. शकुंतलाबाई शामलाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ श्री शामलाल जानकीलाल अग्रवाल ( श्री शाम एजन्सीज परिवार ) यांच्या सौजन्याने व आलय सर्जिकल यांच्या सहकार्याने मोफत भव्य शस्रक्रिया शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात आज 63 रुग्णांवर 91 लघु शस्रक्रिया संपन्न झाल्यात आणि 2 रुग्णांवर 2 मोठ्या शस्रक्रिया करण्यात आल्या. तसेच उर्वरित 13 रुग्णांवर हर्निया शस्रक्रिया लवकरच सुविधा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दोंडाईचा येथे टप्प्या टप्प्याने करण्यात येतील.
आज सकाळी तज्ञ शल्यचिकित्सकांमार्फत उपजिल्हा रुग्णालय येथे शरीरावरील लहान मोठ्या गाठी, पायाचे कुरूप, कान शिवणे, चरबीची गाठ, सिस्ट यांवर शस्रक्रिया करण्यात आल्या व पश्चात औषध देण्यात आले.
आजच्या शिबिराला डॉ बी एल जैन, डॉ कुणाल बच्छाव, डॉ ओमप्रकाश अग्रवाल , डॉ भरत कुलकर्णी, डॉ रोहित पाटील, डॉ सलमान कुरेशी, डॉ कौस्तुभ जयस्वाल, डॉ दर्शन कुलकर्णी, डॉ गिरीश ईशी, डॉ मंजुलता अग्रवाल डॉ प्रफुल्ल दुगड, डॉ तेजस जैन, यांनी शस्रक्रिया यशस्वी रित्या पुर्ण केल्यात. आजच्या संपूर्ण ऑपरेशन च्या कामांसाठी उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा यांच्या संपुर्ण स्टाफ ची आणि रोटरी स्कूल च्या स्टाफ ची मदत मिळाली.
आजच्या तपासणी शिबिराला रोटरी क्लब दोंडाईचा चे सर्व पदाधिकारी , श्री शामलाल जानकीलाल अग्रवाल परिवार च्या वतीने श्री संजय शामलाल अग्रवाल यांचे संपुर्ण कुटुंब आणि आलय सर्जिकल चे श्री चड्डा जी उपस्थित होते. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष हरीश जैन, सचिव सचिन शाह, प्रोजेक्ट चेअरमन डॉ कुणाल बच्छाव, डॉ फुलंब्रीकर, डॉ बी एल जैन, डॉ ओमप्रकाश अग्रवाल,डॉ प्रफुल दुगड, सचिन अग्रवाल, आशिष अग्रवाल, पंकज कवाड, योगेश माहेश्वरी, डॉ जितीन अग्रवाल, हिमांशु शाह, अंकुश अग्रवाल, अनिश शाह, डॉ चेतन बच्छाव, अमर इंदानी, श्रीकांत इंदानी, राकेश जयस्वाल, गुलामरसुल शेख ,अक्षय बोरसे, गजेंद्रसिंह गिरासे, ब्रिजेश अग्रवाल यांचे सहकार्य लाभले.
शस्त्रक्रियेनंतर रोटरी क्लबच्या वतीने उपस्थित सर्व सर्जन आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संपुर्ण स्टाफचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योगपती सरकारसाहेब रावल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो अनिश शाह यांनी केले. रो हरीश जैन यांनी सर्वांचे रोटरी क्लब च्या वतीने स्वागत केले तसेच सर्वांचे सहकार्य यापुढेही मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री शामलाल जानकीलाल परिवार च्या वतीने सौ दिपाली अग्रवाल यांनी व आलाय सर्जिकल यांच्यावतीने श्री चड्डाजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री सरकार साहेब रावल यांनी शस्रक्रिया शिबिरासाठी रोटरी क्लब आणि संयोजक यांचे कौतुक केले व यापुढेही असे कार्यक्रम समाज हितासाठी आयोजित करावेत अशी इच्छा व्यक्त केली. प्रोजेक्ट चेअरमन डॉ कुणाल बच्छाव यांनी उपस्थित सर्व डॉक्टर्स , उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा चे सर्व अधिकारी- कर्मचारी , रोटरी क्लब चे सर्व सदस्य यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आभार व्यक्त केले *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा.*
0 Comments