Header Ads Widget

*संधीवात आणि पक्षाघात तथा लकवा अशा दुर्धर आजारावर आयुर्वेदात रामबाण उपाय आयुर्वेदाचार्य डॉ सुभाष पंचभाई रोटरी सिनियर्सच्या शिबिरात १२८ रुग्णांची तपासणी*

दोंडाईचा ( दि १५/३/२०२६) रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स डॉ रतनसिंग मुणोत अहिंसा हाँस्पिटल व रोटरी आय हॉस्पिटल दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पक्षाघात व संधीवात शिबिर रोटरी आय हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आले शिबिराचे उद्घाटन केरळ येथे प्रशिक्षित व संशोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आयुर्वेदाचार्य डॉ सुभाष पंचभाई यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील नगरसेवक हितेंद्र महाले रोटरी सिनियर्सचे जेष्ठ सदस्य रो डॉ मुकुंद सोहनी रो सुरेश जैन डॉ रतनसिंग मुणोत अहिंसा हाँस्पिटलचे चेअरमन रो राजेश मुणोत अध्यक्ष रो प्रविण महाजन इ मान्यवर उपस्थित होते.
   प्रविण महाजन यांनी प्रास्ताविकात सांगितले की रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सतर्फे यावर्षी विविध आरोग्य शिबिरे राबविण्यात येत आहेत रुग्णांना आजार होऊन उपचार करण्यापेक्षा आजारच होऊ नये याविषयी माहिती देण्यात येते तसेच शरीरातील विविध दुर्धर आजांराविषयी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत डॉ मुकुंद सोहनी यांनी सांगितले की आयुर्वेदामुळे आजाराचे समुळ उच्चाटन होत असते परंतु रुग्णांनी आहार व नियमित उपचार केल्यास दुर्धर आजार बरे होतात .
डॉ सुभाष पंचभाई यांनी सांगितले की वातदोष दुर केल्यास संधीवात व पक्षाघात तथा लकवा अशा दुर्धर आजारांना आयुर्वेदात मुख्यतः वातदोष वाढणे हे कारण मानले जाते. त्यामुळे उपचारांमध्ये वात शांत करणे, स्नायू-संधी मजबूत करणे आणि रक्तसंचार सुधारणे यावर भर दिला जातो. संधीवात (Joint Pain / Arthritis) साठी आयुर्वेदिक उपचार
औषधे (वैद्यांच्या सल्ल्याने)Mahayograj Guggulu – सांधेदुखी, सूज कमी करण्यासाठी.
Simhanada Guggulu – संधिवात आणि आमवातात वापरले जाते.Dashmool Kwath – वातदोष कमी करण्यासाठी.Rasna Saptak Kwath – सांध्यातील वेदना कमी करण्यात मदत करतात सोबत बाह्य उपचार
तिळाच्या तेलाने मालिश
नाडी स्वेदन (स्टीम/गरम शेक)पंचकर्म उपचार – विशेषतः बस्ती (औषधी एनिमा)घरगुती उपाय
सकाळी मेथी दाणे पावडर कोमट पाण्यासोबत
हळद+दूध(anti-inflammatory)लसूण नियमित खाणे इ उपचार केल्यास संधीवातावर मात करता येते.
 पक्षाघात (Paralysis / लकवा) साठी आयुर्वेदिक उपचार औषधे (वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली)Ekangveer Ras – पक्षाघात व नसांच्या कमजोरीसाठी. Brihat Vata Chintamani Ras –मज्जासंस्था मजबूत करण्यासाठीAshwagandha Churna – स्नायू व ताकद वाढवण्यासाठी मदत करतात .सोबतच बाह्य उपचार औषधी तेलाने अभ्यंग (मालिश)  Mahanarayan Taila पंचकर्मशिरोधारा पिंड स्वेदन बस्ती इ उपचारसोबत फिजिओथेरपी आणि हलका व्यायाम पवनमुक्तासन, भुजंगासन (डॉक्टरांच्या सल्ल्याने)संतुलित आहार, तेलकट-थंड पदार्थ कमी करणे इ पुरक उपाय केल्यास अशा दुर्धर आजारातुन रुग्णांची सुटका होऊ शकते . 
शिबिरात एकुण १२८ रुग्णांची तपासणी आयुर्वेदाचार्य डॉ सुभाष पंचभाई व डॉ धनंजय सुभाष पंचभाई यांनी केली तसेच शिबिरातील दुर्धर आजाराचे रुग्णांना डॉ रतनसिंग मुणोत अहिंसा हाँस्पिटल येथे पुढील ७ दिवस मोफत उपचार करण्यात येतील असे राजेश मुणोत यांनी सांगितले.
   कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन रो राजेश मुणोत रो सुरेश जैन रो डॉ मुकुंद सोहनी सचिव डॉ अनिल धनगर राजेंद्र परदेसी डॉ दिपक परमार कमलेश कांकरिया नयन जैन डॉ रतनसिंग मुणोत अहिंसा हाँस्पिटलचे समन्वयक विजय निकुंभ एस पी पाटील रोटरी आय हॉस्पिटलचे व्यवस्थापक गणेश चकणे प्रव्हादसिंग गिरासे आनंद शर्मा शोभा पटेल सतिष कासार इ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा.*

Post a Comment

0 Comments