बेटावद प्रतिनीधी
‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ निमित्ताने शिंदखेडा तालुक्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत याच अभियानाचा एक भाग म्हणून, प्राथमिक आरोग्य केंद्र बेटावद अंतर्गत पाष्टे येथे दि. १४ मार्च २०२६ रोजी भव्य आरोग्य शिबिराचे (NCD Camp) आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व संदर्भ सेवा देण्यात आल्या
आरोग्य पथकाद्वारे तपासणी
जिल्हा आरोग्य अधिकारी (धुळे) आणि तालुका आरोग्य अधिकारी (शिंदखेडा) यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले
या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर , स्ट्रोक, अस्थमा यांचे निदान करून संदर्भ सेवा देण्यात आली ,यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यासहायक आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या
बेटावद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविकांनी या कामी विशेष परिश्रम घेतले
या शिबिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घेतली तसेच शासकीय योजनांची माहिती
आरोग्य तपासणीसोबतच उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली स्वच्छ आरोग्य आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले महसूल आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments