Header Ads Widget

शिंदखेडा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त होमगार्ड महिलांचा गौरवपूर्ण सन्मान

शिंदखेडा (प्रतिनिधी) – ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिंदखेडा येथील पोलीस स्टेशन होमगार्ड कार्यालयात होमगार्ड महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. होमगार्ड बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
समाजाच्या सुरक्षिततेसाठी तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या होमगार्ड महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. यावेळी होमगार्ड बांधवांनी महिलांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महिला सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याचे नमूद केले. होमगार्ड सेवेतही महिला धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारीने आपली भूमिका पार पाडत असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले.
कार्यक्रमात होमगार्ड महिला तसेच युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या प्रदेश महिला संघटक शोभा पाटील याही उपस्थित होत्या. होमगार्ड बांधवांनी त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी होमगार्ड बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परस्पर सन्मान, एकात्मता आणि महिला सशक्तीकरणाचा संदेश देत हा कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments