Header Ads Widget

शिंदखेडा भाजपाचे काँग्रेसच्या लाजिरवाण्या कृत्या विरोधात जोडे मारत निषेध आंदोलन


प्रतिनिधी l शिंदखेडा : अमेरिका व इस्राएलने ईराण च्या विरोधात युद्धाची आक्रमक आघाडी उघडल्यामुळे जगावर गॅस कमतरतेचे संकट ओढवले असुन त्यासंदर्भात दि. १२ मार्च २०२६ रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी व इतर विरोधी पक्षातील खासदारांनी संसद परिसरातील मकर प्रवेशद्वारा जवळ चहा-बिस्कीट घेऊन ‘चायपार्टी’ आयोजित करून संसदेची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केला. लोकसभा अध्यक्षांनी प्रवेशद्वारा जवळ कोणतेही आंदोलन करू नये असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही विरोधकांनी त्याचे उल्लंघन केले, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे याच्या निषेधार्थ दि १५ मार्च रविवारी संध्याकाळी ५ वाजता शिंदखेडया शहरातील भगवा चौक येथे महाराष्ट्र शासनाचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता पार्टी तर्फे काँग्रेसच्या विरोधात राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध आंदोलन  करण्यात आले."राहुल गांधी मुर्दाबाद", "राहुल गांधीचे करायचे काय, खाली डोके वर पाय" या घोषणांनी परिसर दाणाणून सोडला.
        शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,राहुल गांधी जर देशातील कमी झालेल्या एल पी जी (LPG ) गॅसच्या मुद्याबद्दल बोलत असतील तर त्यांनी पहिले भारत सरकार च्या गोष्टी पण ऐकल्या पाहिजेत.फक्त विरोधाला विरोध करू नये. सर्व जगात गॅस कमतरतेचे संकट ओढवले असून त्याची झळ भारतालाही थोडीफार पोहोचलेली आहे. याचा अर्थ असा नाही की भारतात गॅस कमतरतेचे मोठे संकट ओढवले आहे.भारत सरकार भारतीय नागरिकांना गॅस पुरवठा करण्यास सक्षम असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन भारतीय जनता पार्टी मार्फत करण्यात आले.
      प्रसंगी  शहराध्यक्ष संजयकुमार महाजन,पाणीपुरवठा सभापती प्रतिनिधी दादा मराठे,नगरसेवक 
ज्ञानेश्वर सकट, नगरसेवक प्रतिनिधी चंद्रकांत सोनवणे,संदीप राजपुत,
माजी नगराध्यक्ष युवराज माळी, माजी शहराध्यक्ष अँड विनोद पाटील,शाम फुले,दिनेश गोसावी,गोपाल चौधरी, गणेश परदेशी आदी तसेच या आंदोलनात सर्व माजी नगराध्यक्ष,आजी व माजी उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments