दोंडाईचा : दादावाडी येथे दिनांक ३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता आयंबिल पारणा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आयंबिल पारणा करणाऱ्या सदस्यांसह उपस्थित मान्यवरां सोबत येत्या ९ एप्रिल रोजी आयोजित “विश्व नवकार दिवस” निमित्त होणाऱ्या नवकार पत्र विमोचन कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. सदर विमोचन सोहळा जैन समाजातील विविध संघटनांच्या मान्यवर अध्यक्षांच्या हस्ते दादावाडी येथे पार पडणार आहे.
विमोचनासाठी उपस्थित राहणारे मान्यवर पुढीलप्रमाणे : मनोज मालू, दिनेश कर्णावट (सकलसंघ), रितेश गुलेच्छा, भिकमचंद बोथरा (जैन सोशल ग्रुप), प्रदीप मुनोत, प्रकाश कुचेरिया, राजेश मुनोत (तेरापंथ सभा), नयन बाफना, डुंगरमलजी बाफना, धर्मचंदजी बोथरा (मूर्ती पूजन संघ), रितेश सोलंकी, अभिनंदन सांचेती (जैन ड्यूड्स), अनिल पारख, अशोकजी चोरडिया, अभयजी खीवसरा (स्थानक संघ), सुभाषजी बडजात्या (दिगंबर समाज), विनोद बोथरा (युवा जैन सोशल ग्रुप), रोटरी पतपेढी प्रतिनिधी तसेच सुरेश कवाड, जितेंद्र कोचर, चिंतन कोचर यांचा समावेश आहे.
तसेच JLW दोंडाईचा यांच्या वतीने चेअरपर्सन सुगंधा जैन, चीफ सेक्रेटरी हर्षा कांकरीया, नम्रता कावड, डॉ. कल्याणी मुनोत, सपना जैन, ममता गोलेच्छा, पूनम बाफना (कोर कमिटी) तसेच कनेक्टिंग कमिटीतील सुवर्णा रुणवाल, रुपाली मालू, सीमा खीवसरा, दीपा पारखा यांच्या समक्ष नवकार विमोचन करण्यात आले.
JLW दोंडाईचा कोर कमिटीच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, जैन समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
जीतो लेडीज विंग, दोंडाईचा तर्फे सर्वांना आवाहन करण्यात येते की, दिनांक ९ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता दादावाडी येथे नवकार मंत्र जपासाठी उपस्थित राहावे *✍️✍️श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा.*
0 Comments