Header Ads Widget

🚨 मध्यरात्रीचा धाडसी डाका! शेतात घुसून ५ जनावरे लंपास; अमळनेर तालुका हादरला 🚨

सुजान नागरिक प्रतिनिधी : श्री. सी. जी. वारूडे (म्हळसर)
अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील ढेकू शिवारात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास थरारक चोरी करत शेतकऱ्याचे मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ढेकू खुर्द येथील शेतकरी महेंद्र सयाजीराव पाटील (वय ४३) यांच्या गट क्रमांक ९७ मधील शेतात ही घटना घडली. शेतातील कंपाऊंडमध्ये सुरक्षित बांधून ठेवलेली जनावरे चोरट्यांनी लक्ष्य करत तब्बल ५ जनावरे (४ गायी व १ गोरा) लंपास केली. विशेष म्हणजे, चोरीस गेलेल्या गाईंमध्ये दोन गायी गर्भवती असल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत अधिक भर पडली आहे.
ही घटना दिनांक १ ते २ एप्रिलच्या मध्यरात्री घडली असून, पहाटे सुमारे ५:३० वाजता ही बाब उघडकीस आली. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे अंदाजे ८७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत शिंपी करीत आहेत.
🔍 परिसरात भीतीचे वातावरण
या घटनेमुळे ढेकू व आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनी जनावरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments