Header Ads Widget

भडणे परीसरात वारा व अवकाळी पावसामुळे मका बाजरी ज्वारी पपई केळी टरबूज पिकांची प्रशासनाकडून पाहणी व पंचनामाना वेग,,,,,,,,

भडणे परिसरात दोन एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता अवकाळी पाऊस व वारा मुळे परिसरात मका ज्वारी बाजरी पपई केळी टरबूज पिकांची मोठ्या
 प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी प्रशासनास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांची  पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते 
प्रशासनातर्फे महसूल विभागाचे भडणे येथील महसूल अधिकारी सोनाली कुंभार कृषी सहाय्यक प्रशांत पाटील पोलीस पाटील युवराज माळी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकाची पाहणी करून नुकसान झालेल्या पीक व पिकाचे क्षेत्र यांची माहिती घेऊन पंचनामा करण्यात आला

Post a Comment

0 Comments