परसामळ (प्रतिनिधी) : शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी परसामळ येथे रविवारी (दि. ५ एप्रिल २०२६) सायंकाळी ५ वाजता भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जितेंद्रसिंह रावल उर्फ सरकार साहेब यांच्यासह सचिन राजपूत, रवींद्र गिरासे (सोमु भैय्या), महावीरसिंह रावल, विजयसिंह राऊळ, प्रतापसिंह राजपूत (आप्पा), नारायण भाऊसाहेब, जिजाबराव भाऊसाहेब, डी.एस. गिरासे सर, विश्वनाथ पाटील, विष्णू पाटील, विरेंद्र राजपूत (आबा), विलासिंह पाटील (जळगाव), विरेन गिरासे (शिरपूर)राकेश गिरासे (मा. उपसरपंच,वरूळ)आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून पुतळा उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक करताना शशिपालसिंह राजपूत यांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, त्याग व स्वाभिमानाचा आदर्श समाजाने अंगीकारावा, असे प्रतिपादन केले.
यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात युवकांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजकार्य व राष्ट्रसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात जितेंद्रसिंह रावल यांनी अशा ऐतिहासिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता व प्रेरणा निर्माण होते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोकुळ राजपूत यांनी मानले. महाराणा प्रतिष्ठान, परसामळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी गोटूसिंग गिरासे व मानसिंग गिरासे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी सरपंच कलाबाई नगराळे, कोमलसिंग राजपूत, आनंदसिंग राजपूत, दिलीपसिंह राजपूत, श्वेतलसिंग राजपूत, महेंद्र राजपूत, जितेंद्रसिंह राजपूत, दीपक राजपूत, खुशालसिंह राजपूत, केदार राजपूत, त्र्यंबक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दाजभाऊ कोळी, भोजू कोळी, नाना भिल यांच्यासह परसामळ व परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments