नरडाणा: पाटोदा गावचे राष्ट्रपती पुरस्कार व महाराष्ट्राचा कर्मयोगी पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच.
श्री भास्करराव पेरे पाटील यांनी नरडाणा येथील 'आय लव्ह नरडाणा सेल्फी पॉईंट' व ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब संजय मधुकर सिसोदे यांच्या निवासस्थानी भेट दिली व 'आय लव्ह नरडाणा सेल्फी पॉईंट' पॉईंटंचा उल्लेख धांदरणे येथील
आपल्या व्याख्यानात आवर्जून केला.या वेळी धुळे जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी सिसोदे, श्री. सिद्धार्थ सिसोदे, प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे, उपप्राचार्य डॉ. एन. के. पाटील, उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील,
उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माळीच शाळाध्यक्ष श्री. विश्वासराव देसले, श्री.प्रदीप शिंपी, सतीश चोरडिया व मित्र परिवार हजर होते.
सिसोदे यांच्या घरगुती भेटी प्रसंगी ग्रामविकासावर दिलखुलासपणे गप्पा मारल्या. माझ्या पाटोदा ग्रामपंचायतला गाडगे बाबा स्वच्छता अभियान मध्ये महाराष्ट्रातील एक नंबरचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळाला. अनेकानी विशेषतः महिला वर्गांनी खूप साथ दिली पुरस्कार त्यांना समर्पित केला. अडचणीही, अडथळेही प्रेरणादायी ठरले. येथे ग्रामपंचायत कराची वसुलीही होत नव्हती. तेथे वर्षाला 5000 कराची वसुलीही 100 टक्के एप्रिल महिन्यातच व्हायला लागली. प्रथम ग्रामपंचायत कर भरणाऱ्या कुटुंबातील महिलेला ध्वजारोहणाचा मान दिला. वर्षातून चार वेळा ध्वजारोहण होते. गावात 24 तास पाणीपुरवठा वापरायचे पाणी, फिल्टर पाणी, गरम पाणी असे प्रत्येक घराला चार प्रकारच्या नळाद्वारे पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला. ग्रामपंचायत कडून पिठाची चक्की वडे पापड कुरडया वेफर्स मसाले यांची चक्की याच बरोबर ग्रामपंचायत ट्रॅक्टरने मोफत नांगरणी आणि आता तर इलेक्ट्रिक कार चार्जिंग पॉइंटही ग्रामपंचायतने सुरू केला. अशा अनेक सुविधा निर्माण करून दिल्या. प्रत्येक कुटुंबाचा दैनंदिन सुविधांसाठी होणारा वर्षाचा 20,000 ते 25,000 रुपये होणारा खर्च फक्त ग्रामपंचायत च्या 5000 करांमधून उपलब्ध करून दिला.
सुरुवातीला त्रास झाला पण आता अत्यल्प दरात सर्व सुविधा सहज मिळत असल्यामुळे व हजारो रुपये बचत होत असल्यामुळे 1 एप्रिलपासून 5000 ग्रामपंचायत कर भरण्यासाठी स्पर्धा लागते व पहिल्या सात-आठ दिवसातच संपूर्ण वर्षाची वसुली होते. संपूर्ण गाव फळझाडांनी संपन्न झाले आहे. वर्षाला 35,000 ते 40,000 नारळे निघतात. पुढील दोन-चार वर्षात 50,000 पर्यंत नारळाचे उत्पन्न मिळेल. कर्तव्य पुर्ती व ग्रामसेवेचा आनंद पुरस्कारापेक्षाही मोठा आहे. या पुरस्कारामुळे मला माझ्या आदर्श दैवत राष्ट्रपती अब्दुल कलामां पासून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग ते उद्योगपती रतन टाटा पर्यंत सहवासाची संधी मिळाली. अनेक मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी गावाला भेट दिली. त्यातून भरगोस निधी मिळाला व मला प्रेरणा मिळाली, कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळाला. आज माझ्यासारख्या अल्पशिक्षित माणसाला गावोगावचे लोक व्याख्यानासाठी बोलतात यातून ग्रामस्थांनी काही बोध घ्यावा, गावे सुधरावीत हीच इच्छा आहे.
0 Comments