Header Ads Widget

*बाजारात दवा मिळते दुवा मिळत नाही हजारो रुग्णांची दुवा सरकार साहेबांना दिर्घायुष्य करते - नगराध्यक्षा नयनकुँवर रावल* *सरकारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे महाआरोग्य शिबिरात ५७० रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार*

दोंडाईचा (श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी यांचेकडून )  आदरणीय लोकनेते मा. श्री. सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, दोंडाईचा शहर व हर्षल सर्जिकल हॉस्पिटल, सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर रोटरी भवन, दोंडाईचा येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा माँसाहेब नयनकुँवर रावल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. हर्षल मिस्त्री होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, विक्रम पाटील व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रविण महाजन यांची उपस्थिती लाभली.
या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ५७० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. यामध्ये शल्यचिकित्सक डॉ. हर्षल मिस्त्री, औषधीतज्ञ डॉ. प्रधान निकुंभ, डॉ. कल्पेश जिन्जाला, डॉ. मिलन धोला, डॉ. मितुल जिन्जाला आदींचा समावेश होता. रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी व औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले.
तसेच, गंभीर व दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी सुरत येथे मोफत किंवा माफक दरात शस्त्रक्रिया व औषधोपचार उपलब्ध करून देण्याची विशेष सोय करण्यात आली असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी नगराध्यक्षा माँसाहेब नयनकुँवर रावल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सरकारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबविल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळतो व त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभेल.”
प्रास्ताविकात प्रविण महाजन यांनी सांगितले की, “दरवर्षी सरकारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया व उपचार करून हा दिवस साजरा केला जातो, ही परंपरा समाजासाठी प्रेरणादायी आहे.”
कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन शिबिराचे कौतुक केले. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रविंद्र सोनवणे डॉ अनिकेत मंडाले राजेश मुणोत भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे गटनेते निखिल जाधव बांधकाम सभापती मुकेश देवरे जितु गिरासे सर विजय मराठे, महेंद्र पाटील, कृष्णा नगराळे, नरेंद्र गिरासे भरतरी ठाकूर, संजोग रामोळे, संजय तावडे, मनोज धनगर, महेंद्र कोळी, अनिल अग्रवाल भालचंद्र पाटील तसेच नगरसेविका सौ. वैशाली महाजन, आरोग्य सभापती सौ. सरला सोनवणे शिक्षण सभापती सौ वैशाली कागणे सौ. ललिता गिरासे, सौ भावना महाले सौ. भारती मराठे, सौ. राणी अग्रवाल, सौ. देवयानी रामोळे, सौ. मनीषा गिरासे, सौ. पूजा खडसे सौ रोहिणी लिंभारे यांची उपस्थिती होती.
तसेच रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष कमलेश कांकरिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश माहेश्वरी, लायन्स क्लबचे अध्यक्ष गजेंद्र घोडके, आरसीसी दोंडाईचाकरच्या अध्यक्षा सौ. वैशाली सोनार, जायंट्स सहेलीच्या अध्यक्षा सौ. मिनाक्षी जाधव जेष्ठ पत्रकार जे.पी. गिरासे मनोहर देवरे, जितेंद्र गिरासे रणजीत राजपूत रविंद्र चौधरी अण्णा कोळी प्रमोद राजपूत मंजुम पठाण अजमल सिकलीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण महाजन यांनी केले, सूत्रसंचालन रविंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली महाजन यांनी मानले.
एकूणच, या भव्य आरोग्य शिबिरामुळे दोंडाईचा शहर व परिसरातील शेकडो रुग्णांना मोफत उपचार मिळून मोठा दिलासा मिळाला असून हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

Post a Comment

0 Comments