विद्यावर्धिनी परिसर साक्रीरोड ते सुरत बाय पास पर्यंत असंख्य कॉलन्यांमध्ये आठवडा भरा पासून पिण्याचे पाणी नाही . अंघोळी तर कोसो दूर आहेत . श्रमिक कॉलन्यांमधील असंख्य बाया बापड्या हंडे घेऊन पाण्याचा शोध घेत आहेत . पाणी का येत नाही याचे उत्तर मिळत नाही . अधिकारी येईल असे म्हणतात पण पाणी सोडण्याच्या नावे ठणठणाठ . पाणी सोडणारे भूमिगत आहेत . पाणीदार नेते कुठे दिसत नाहीत ? जिसकी लाठी उसकी भ्यैंस ' अशा नगरसेवकांच्या वस्त्यांमध्ये मुबलक पाणी आहे मात्र पांझरा दूथडी वाहून , भरपूर पाऊस पडून , शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन आमच्या छातडावरून वाहतात तरी आम्ही ' कोरडबोंडे ' आहोत या पेक्षा दूर्दैव ते कोणते असू शकते ? -
गो पि लांडगे ( ज्येष्ठ पत्रकार ) धुळे .
94227 95910
0 Comments