Header Ads Widget

*शिंदखेडा तालुका विज्ञान मंडळाची सहविचार सभा संपन्न*

   शिंदखेडा येथील पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका मुख्याध्यापक संघ ,तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने पंचायत समिती  कार्यालय शिंदखेडा येथे तालुकास्तरीय सहविचार सभा संपन्न झाली.  
     पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री. डी एस सोनवणे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते तर सदर सभेस धुळे जिल्हा विज्ञान संघ सचिव श्री एस एस गोसावी, उपाध्यक्ष श्री जे डी भदाणे शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ सचिव श्री.एम.डी पाटील, तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष श्री एस एन माळी सचिव श्री ए टी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
    सभेत या शैक्षणिक वर्षात संपन्न होणाऱ्या शिंदखेडा तालुका स्तरीय विज्ञान मेळावा व नाट्य महोत्सव या विषयावर चर्चा करण्यात आली तसेच वर्षभरात घेण्यात आलेल्या विज्ञान व गणित उपक्रमांची माहिती मांडण्यात आली.शैक्षणिक वर्ष 2026 करिता अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळावा हा 18 ऑगस्ट रोजी श्री स्वामी समर्थ विद्यालय शिंदखेडा येथे तर नाट्य महोत्सव  27ऑगस्ट रोजी गो सो देवकर विद्यालय विरदेल येथे  घेण्यासंदर्भात विचार झाला.तरी शिंदखेडा तालुक्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शाळांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन  गटशिक्षणाधिकारी श्री.डी एस सोनवणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments