गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षिका सौ. संगीता पाटील मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन गुरुंप्रती आदर व्यक्त करताना इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. श्रेया मनोज चौधरी.
पुष्पगुच्छ अर्पण करून व्यक्त केला गुरुंप्रती कृतज्ञतेचा भाव
धुळे : गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने धुळे येथील कमलाबाई कन्या शाळेतील इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. श्रेया मनोज चौधरी हिने आपल्या वर्गशिक्षिका सौ. संगीता पाटील मॅडम यांना पुष्पगुच्छ अर्पण करून गुरुंप्रती असलेला आदर, सन्मान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
भारतीय संस्कृतीत गुरुंना सर्वोच्च स्थान असून, गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. याच परंपरेचे जतन करत कु. श्रेयाने आपल्या शिक्षिकांचा सन्मान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी तिच्या संस्कारपूर्ण कृतीचे कौतुक केले.
कु. श्रेया ही धुळे येथील साक्री रोडवरील सुप्रसिद्ध कल्याणी दूध डेअरीचे व्यवस्थापक मनोज चौधरी यांची कन्या असून, तिच्या या कृतीमुळे गुरु-शिष्य परंपरेचा सुंदर आदर्श समाजासमोर उभा राहिला.
0 Comments