Header Ads Widget

'आदर्श मुख्याध्यापक' पुरस्काराने सुरेश गंगाराम पाटील (जाधव) यांचा गौरव; पाष्टे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

शिस्तप्रिय नेतृत्व, विद्यार्थ्यांप्रती समर्पण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मानाचा सन्मान
पाष्टे | प्रतिनिधी
पाष्टे येथील शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले मुख्याध्यापक सुरेश गंगाराम पाटील (जाधव) यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल "आदर्श मुख्याध्यापक" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे पाष्टे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुरेश पाटील यांनी आपल्या नियोजनबद्ध कामकाज, शिस्तप्रिय स्वभाव, विद्यार्थ्यांप्रती असलेले समर्पण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे शाळेचा लौकिक उंचावला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता विकसित करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
"आदर्श मुख्याध्यापक" हा सन्मान त्यांच्या दीर्घकालीन कार्याची पोचपावती असून त्यांच्या कार्यातून भविष्यातही अनेक शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहो, अशा शुभेच्छा नागरिक, पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून व 
भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष शिवसेना शिंदे गटाचे शिंदखेडा तालुका त्यांचेकडुन मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments