जि.प. शाळेसाठी स्वत:ची दोन एकर जागा देणारे
स्व. नथ्थूबाबा भलकार यांची पुण्यतिथी साजरी
तर्हाडी- येथील स्व. नथ्थु भलकार यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष तापी परिसर संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे होते त्याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ओंकार पाटील यांनी आपल्या मनोगतातुन स्व. नथ्थु भलकार यांच्या कार्याला उजाळा दिला. स्वर्गीय भलकार बाबा यांनी आपल्या गावातील मुला मुलींना शिक्षण मिळावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद शाळेसाठी स्वतःची दोन एकर जागा मोफत दिली त्यांच्या ह्या उदात्त कार्याबद्दल आठवण करून दिली याप्रसंगी सुतगिरणीचे संचालक सुदाम बापू भलकार, पोलीस पाटील प्रताप गिरासे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रफुल पाटील, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संचालक सुनील भामरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण अहिरे, विविध कार्यकारीसोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर सोनवणे, पिक संरक्षण सोसायटीचे सदस्य शिवराम पाटील, कृषी मित्र किरण भामरे, नरेश सोनवणे, कैलास करंके, गौतम अहिरे, चुडामण भामरे, अर्जुन करंके, गुलाबराव भलकार, नरेंद्र दुसाने, त-हाडी मल्हार सेनेचे अध्यक्ष सुदाम न्हाळदे, रघुनाथ बोरसे, माजी पोस्ट मास्तर ताराचंद जाधव, संतोष आडगाळे, राजेंद्र भलकार ,बबलू सोनवणे, अशोक अहिरे ,गोपाल भिल, सुनील कंखरे, राजेंद्र पाकळे, भगवान खोंडे, प्रवीण सोनवणे, नारायण भलकार रावसाहेब भलकार , सुतगिरणीचे माजी संचालक मल्हारराव भलकार, उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे औचित्ये साधून त-हाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष प्रा.उदय भलकार यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटे वाटप करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बडगुजर सर, जगन्नाथ भामरे व सर्व शिक्षक बंधू-भगिनी मेहनत घेतली.
0 Comments