शिंदखेडा: येथील एस.एस. व्हि.पी. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा, आयक्यूएसी व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग आणि आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. सदर शिबिरात विद्यार्थ्यांना करिअर संधी, रोजगार क्षमता कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान कौशल्य प्रशिक्षण, उद्योग केंद्रित प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल जागृता निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी वरिष्ठ महाविद्यालयातील टी. वाय. बी.ए., बी. कॉम., बी.एस्सी, एम.एस्सी व मागील वर्षी पास झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यशाळा उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशुतोष पाटील, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.जितेंद्र पाटील व आयक्यूएसी समन्वयक डॉ. सिद्धार्थ सावंत यांनी केले.
0 Comments