*मोबाईलच्या आधीन गेलेला आजचा बालक व युवकाने मैदानी खेळात सहभागी होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य शूद्रविले पाहिजे या अनुषंगाने जागतिक आदिवासी दिवस चे औचित्य साधत...*
सोनगीर येथील एन.जी. बागुल हायस्कूल येथे
शितल स्पोर्ट्स अकॅडमी सोनगीर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना *सर्व मैदानी खेळ चे प्रशिक्षण देण्याची सुरुवात झाली.*
सर्वप्रथम भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पूजन केले यावेळी अध्यक्षस्थानी एन जी बागुल हायस्कूलचे चेअरमन श्री सुनील बागुल सर हे होते तर क्रीडाप्रेमी ,एन जी बागुल हायस्कूलचे खजिनदार श्री अविनाश भाऊ महाजन यांनी मैदानी खेळ खेळल्याने शारीरिक आरोग्य सुधारते याचे महत्व पटवून दिले, श्री अमित भाऊ बागुल यांनी मैदान उपलब्ध करून दिले,
व अनुभवी क्रीडा प्रशिक्षक श्री एन व्ही पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कबड्डीचे प्रशिक्षण दिले, श्री प्रशांत धनगर (फेन्सिंग नॅशनल खेळाडू) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, सुत्रसंचलन प्रा सागर पटेल सर यांनी केले , हॉलीबॉल चे प्रशिक्षक व क्रीडाश्री किशोर लोहार यांनी तर फुटबॉलचे प्रशिक्षक ए डी महाजन सर (अनुभवी क्रीडाशिक्षक)
खो-खो चे प्रशिक्षण एस आर राठोड सर व क्रिकेटचे प्रशिक्षण रवींद्र मोरे सर व फेन्सिंगचे प्रशिक्षण नॅशनल मेडलिस्ट विशाल राव सर व इतर मैदानी खेळाचे प्रशिक्षण धनंजय गुजर सर यांनी दिले यावेळी आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत माजी ग्रा.पं. सदस्य श्री राजू दादा बिल त्यांनी आभार मानले , व पिंटु भिल (ग्रा.प. सदस्य सोनगीर ) व देवीसिंग सोनवणे (माजी, सैनिक) तर यावेळी कपिल वाघोडे, विपिन सोनवणे (रायफल शूटिंग प्रशिक्षक) या वेळी कै.अण्णासाहेब एन जी बागुल प्रतिष्ठान चे विशेष सहकार्य लाभले तर सुनील भदाणे, विजय सोनवणे (संचालक व्ही.एस क्रिएशन) धीरज पाटील, जयेश माळी ,भावेश मोरे, उपस्थित होते
*शासकीय जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त सागर पटेल सर यांची सुप्रसिद्ध शितल/प्रवक्ता अकॅडमीच्या माध्यमातून फेन्सिंग(तलवारबाजी) या खेळात 15 खेळाडू 2024 व 2025 या वर्षात राज्यस्तरीय पदक पटकाविले पण आता अकॅडमीच्या माध्यमातून मैदानी खेळ मध्ये देखील खेळाडूंना प्रशिक्षण मिळेल असे सागर पटेल सर यांनी जाहीर केले* यावेळी खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
0 Comments