शिंदखेडा प्रतिनिधी
आदिवासी एकता परिषद यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त शिंदखेडा शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत शिवसेना शिंदखेडा तालुक्याच्या वतीने सहभागी होत आदिवासी बांधव व भगिनींना जागतिक आदिवासी
दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.मिरवणुकी दरम्यान याहा मोगी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना परिवहन सेनेचे सुरेश सोनवणे, नगरसेवक प्रतिनिधी गुलाब सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश चौधरी, तालुका उपप्रमुख भालचंद्र पाटील, शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल पाटील, तालुकाप्रमुख भूषण पवार, उपप्रमुख सचिन चौधरी, श्रमिक कामगार सेनेचे तालुकाप्रमुख अशोक बडगुजर, युवा सेनेचे तालुका
उपाध्यक्ष नितीन सकट यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही मिरवणूक एमएचएस हायस्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुरू होऊन बिजासनी मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीत शेकडो आदिवासी बांधव व भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.ढोल-ताशे व वाद्यांच्या तालावर नाचत-गाजत मिरवणूक मार्गक्रमण करत असताना संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक उत्साह आणि आदिवासी समाजाच्या एकजुटीचे दर्शन या मिरवणुकीतून घडले.जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती, अस्मिता आणि हक्कांचे जतन करण्यासोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीचा संदेश देणारा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.शिवसेनेच्या वतीने आदिवासी बांधवांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी सदैव सहकार्य करण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.या उत्साहपूर्ण मिरवणुकीमुळे शिंदखेडा शहरात आदिवासी संस्कृती आणि एकतेचा जल्लोष पाहायला मिळाला.
या उत्साहपूर्ण मिरवणुकीमुळे शिंदखेडा शहरात आदिवासी संस्कृती आणि एकतेचा जल्लोष पाहायला मिळाला
0 Comments