Header Ads Widget

*जागतिक आदिवासी दिनानिमित्त रंजाणे येथे ‘पंचशील नगर’ नामफलकाचे अनावरण* ; *जल, जंगल, जमिनीच्या हक्कांवर जनजागृती*

​शिंदखेडा ( यादवराव सावंत,प्रतिनिधी):
तालुक्यातील रंजाणे येथे ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन अत्यंत उत्साहात आणि भव्य दिव्या वातावरणात साजरा करण्यात आला. आदिवासी बांधव आणि आंबेडकरी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
​कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व विनम्र अभिवादन करून झाली.
​ *‘पंचशील नगर’ नामफलकाचे अनावरण* 
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे रंजाणे गावातील ‘पंचशील नगर’ नामफलकाचे अनावरण. वंचित बहुजन आघाडीचे नेते राहुल भाऊ पाटोळे यांच्या शुभहस्ते हा नामफलक अनावरणाचा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांनी दिलेल्या ‘जय भीम’ आणि ‘जय आदिवासी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
​ *जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांचा गजर* 
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना वक्त्यांनी आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांवर प्रकाश टाकला. ‘जल, जंगल आणि जमीन’ यावर आदिवासी बांधवांचा नैसर्गिक हक्क असून त्याचे रक्षण करणे आणि समाजाला आपल्या हक्कांप्रती जागरूक करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. आंबेडकरी समाज आणि आदिवासी समाज यांच्यातील ऐक्य अधिक बळकट करण्याचा संकल्पही या वेळी करण्यात आला.
​ *ग्रामस्थांची मोठी उपस्थिती* 
या सोहळ्याला रंजाणे गावातील आदिवासी बांधव, माता-भगिनी, तरुण वर्ग आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला एका मोठ्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments