Header Ads Widget

*शिंदखेडा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन उत्साहात संपन्न*

​शिंदखेडा (यादवराव सावंत,प्रतिनिधी):
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शिंदखेडा शहरातील वरपाडा रोड, वीर एकलव्य नगर (बंगला भिलाटी) येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिंदखेडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती कलावती सुकलाल माळी यांच्या हस्ते आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
​कार्यक्रमा दरम्यान आदिवासी संस्कृती आणि समाजाचे देशविकासातील योगदान यावर उपस्थितांनी प्रकाश टाकला. वीर एकलव्य नगरात पार पडलेल्या या कार्यक्रमास स्थानिक नागरिक आणि महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सोहळ्याला माजी नगरसेवक दीपक अहिरे, जिभाऊ फुले, अशोक सोनवणे, नामदेव भिल, दीपक मालचे, जिभाऊ अहिरे, संजू मोरे, लालचंद अहिरे आणि रमेश भिल यांची प्रमुख उपस्थिती होती.
​तसेच परिसरातील महिलांचा सहभाग  आला. वझताबाई सोनवणे, ममता फुले, सुजाबाई भिल यांच्यासह वीर एकलव्य नगर व परिसरातील माता-भगिनी आणि नागरिक उपस्थित होते. अतिशय उत्साही व मंगलमय वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments