Header Ads Widget

*नाशिक येथील तारांगण संस्थेचे वतीने दोंडाईचा शिंपी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*


 दोंडाईचा श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी यांचेकडून 
श्री संत शिरोमणी श्री नामदेव  महाराज संजीवन सोहळा कार्यक्रमानिमित्त सौ सुनिताताई बाविस्कर तारांगण संस्थापक अध्यक्ष समाजसेविका (नाशिक, धुळे, निजामपुर) यांनी दोंडाईचा शहरातील इयत्ता 10 वीत व इयत्ता 12 वीत प्रथम आलेल्या विद्यार्थीनींना  कै. लोटन रामचंद्रशेठ बाविस्कर यांच्या  स्मरणार्थ मुलांचा शैक्षणिक आनंद द्विगुणित करण्याकरिता रु. 500 जाहीर केलेले आहेत. तदअनुषंगाने आज सकाळी समाज मंगल कार्यालयात इयत्ता १२ वीत कु. नम्रता सतीष जाधव हिस 78% मिळालेले आहेत व इयत्ता १० वीत कु. श्रेया मनोज कापुरे हिस 88.80% गुण मिळालेले आहेत. दोघ विद्यार्थीनींचा दोंडाईचा शहर अध्यक्ष श्री. मनोज मेटकर सल्लागार प्रा. प्रकाश भांडारकर, पांडुरंग शिंपी, श्री. मधुकर जाधव सचिव श्री. सतीष जाधव कार्यकारिणी सदस्य श्री. गोपाल कापूरे, श्री. रामचंद्र चित्ते, श्री. मनोज कापुरे यांच्या उपस्थितीत बक्षीसाची रक्कम रु. 500/- देण्यात आली. यावेळी मनोज कापुरे कु. श्रेया मनोज कापूरे यांनी दोंडाईचा शिंपी समाज मंगलकार्य बांधकाम सुरू असलेल्या कामास
शैक्षणिक आनंद द्विगुणित करण्याकरिताचे RS. 500
कु. साची मनोज कापूरे 
Excellent award in Hindi Hasti public school Rs. 200
असे रु 700 हे बक्षिसा चे पैसे समाज बांधकामासाठी देण्यात आले आहे.
दोघ विद्यार्थीनींना पुढील शैक्षणिक प्रगतीस हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन. 
💐💐💐

Post a Comment

0 Comments