दोंडाईचा : दोंडाईचा सांस्कृतिक मंचतर्फे शहरातील युवकांमध्ये सांस्कृतिक व पारंपरिक कलांचा विकास व्हावा, या उद्देशाने ढोल-ताशा पथकाच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
मा.ना.श्री.जयकुमारभाऊ रावल यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या प्रशिक्षणाला शहरातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक ढोल-ताशा वादनाची कला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष श्री. विक्रम पाटील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भोई यांनी केले. मनोज तेले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला, तर मच्छिन्द्र मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन, भरतरी ठाकूर, कृष्णा नगराळे, संजोग रामोळे, रविंद्र जाधव, सरजू भिल यांच्यासह दोंडाईचा शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ढोल-ताशाच्या गजराने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी सण-उत्सवांमध्ये दोंडाईचा शहराचे सांस्कृतिक वैभव अधिक जोमाने अधोरेखित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विक्की कोळी, चेतन धनगर, प्रतीक चौधरी, मच्छिंद्र मराठे यांनी मेहनत घेतली.
0 Comments