Header Ads Widget

*शिंदखेडा येथे ९ ऑगस्ट रोजी 'विश्व आदिवासी गौरव दिन' उत्साहात साजरा होणार; रॅली व भव्य कार्यक्रमाचे आयोजन*

​शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :-
'विश्व आदिवासी गौरव दिना'चे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी शिंदखेडा शहरात विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील आदिवासी बांधव, महिला व तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
​या सोहळ्याचे आयोजन आदिवासी एकता परिषद, आदिवासी टायगर सेना, एकलव्य क्रांती सेना, एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य (शिंदखेडा) आणि एकलव्य आदिवासी क्रांतीकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
​ *रॅली व कार्यक्रमाची रूपरेषा* :
 *​कार्यक्रमाचे अध्यक्ष:* मा. श्री. नामदार जयकुमार भाऊ रावल (कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री, धुळे जिल्हा) *रॅलीचे उद्घाटक:* मा. श्री. अनिल वानखेडे (गटनेते, नगरपंचायत व मा. नगरसेवक, शिंदखेडा
​ *रॅलीची सुरुवात* : वीर एकलव्य नगर, वरपाडा रोड, शिंदखेडा
 *​मुख्य कार्यक्रम स्थळ:* बिजासनी मंगल कार्यालय, शिंदखेडा
​९ ऑगस्ट रोजी सकाळी वीर एकलव्य नगर येथून रॅलीला सुरुवात होईल. शहरातून निघणारी ही रॅली बिजासनी मंगल कार्यालय येथे पोहोचल्यानंतर तेथे मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
​आदिवासी संस्कृतीचे जतन, समाजाचे संघटन आणि हक्कांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने या गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात शिंदखेडा तालुक्यातील जास्तीत जास्त महिला, तरुण आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन गुलाब सोनवणे, सुरेश मालचे यांच्यासह सर्व आयोजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments