दिनांक -०३/०८/२०२६वार-सोमवार
सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री सी जी वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित,अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात 'लोकमान्य टिळक' पुण्यतिथी व 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आल्या
या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब श्री.एस.ए.कदम सर व प्रमुख पाहुणे-संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री.जे.बी.पाटील व संचालिका श्रीमती भारती मॅडम यांच्या हस्ते "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक" व "लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे" यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणं व गीत गायन व्यक्त केलीत नंतर शिक्षक-पी.आर.पाटील,एस.एस.पाटील,सी.जी.वारूडे ,एस.बी.भदाणे,आर.बी.गवळे,पी.जे.पाटील,श्रीमती बी.जे.पाटील मॅडम यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब यांनी प्रथमतः बालपण व शालेय जीवनातील शेंगांच्या टरपले शिक्षा न घेण्याबाबत,पुण्यात प्लेग साथ इंग्रजांच्या उद्गार सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? , तुरुंगवास- गीतारहस्य ग्रंथ लेखन केले नंतर लोकमान्य शब्दाचा अर्थ व जनतेच्या हितासाठी - "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळविणारच!" अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक इ.विषयी..
तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे त्यांचा जन्म १/ऑगस्ट/१९२० गाव-वाटेगाव ता.वाळवा,जि.सांगली, बालपण ते लोकशाहीर प्रवास - अण्णाभाऊ साठे हे एक एक मराठी समाज सुधारक लोककवी आणि लेखक होते साठी एका अस्पृश्य मातंग समाजामध्ये एक दलित आणि उपजत ओळख त्यांचे लेखन आणि राजकीय कृतीशीलतेचे केंद्रबिंदू होते अण्णाभाऊ हे शाळेत शिकलेले नाही केवळ दीड दिवस ते शाळेत गेलेले नंतर सर्वांद्वारे होणाऱ्या भेदाभावामुळे त्यांनी शाळा सोडून दिली परंतु अण्णाभाऊ हे उपजत बुद्धीवादी होते त्यांनी इंग्रजांच्या राजवटीत समाजाला कलाकुशलता-शाहिरापणाच्या माध्यमातून स्वातंत्र व संयुक्त महाराष्ट्र चळवळ संदर्भात त्यांनी कथा कादंबऱ्या पटकथा, नाटक, लावण्या, पोवाडे गायले व त्यांची गाजलेली कादंबरी "फकिरा","माझी मैना" गावाकडे राहिली, रशिया प्रवासवर्णन,इ.विषयी महत्त्व पटवून दिले.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, संचालक मंडळ, पालक वर्ग, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन -आर.बी.गवळे यांनी मानले..
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जे.एस.कदम,एम.वाय.पाटील,पी.एस.शिसोदे,डी.डी.कदम,पी.डी.खोंडे आदिंनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आली.
0 Comments