Header Ads Widget

*धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा चे आयोजन*

शिरपूर पिपल्स बँकेचे माजी संचालक स्व. नंदु उखा  ठाकरे    यांनी स्थापन केलेल्या धनगर समाज कर्मचारी मंचच्या वतीने दि.30.08.2026 वार रविवार रोजी शिरपूर तालुक्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम अहिल्या लॉन्स शिरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे त्या संदर्भात अहिल्या लॉन्स शिरपूर येथे धनगर समाज कर्मचारी मंचचे अध्यक्ष रामचंद्र उखा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेण्यात आली त्या बैठकीत इ.12वी ला 75 टक्के गुण व दहावीला 80 टक्के गुण ज्या विद्यार्थ्यांना असतील त्या विद्यार्थ्यांचा, तसेच JEE व NEET परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा , तसेच होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे नियोजन करण्यात आले.त्याचप्रमाणे समाजातील सेवानीवृत्त कर्मचारी व पदोन्नती मिळालेल्या कर्मचारी बांधवाचा सत्कार सोहळा याचेही आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाला धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील धनगर समाजाचे विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीत. धनगर समाज कर्मचारी मंचचे जेष्ठ सदस्य ज्ञानेश्वर हडप, रतिलाल पाकळे, धनगर समाज कर्मचारी मंचचे खजिनदार सुभाष भलकार,शिरपूर पीपल्स बँक चे अधिकारी अरुण सोनवणे, रामचंद्र भलकार, देविदास निळे,महेश धनगर,प्रा.उदय भलकार, ब्रिजलाल धनगर, नंदलाल भामरे,प्रा.सतिष निळे, भूषण पेंढारकर, जगदीश धनगर, समाधान धनगर, विशाल भलकार, निलेश आढावे,रवी धनगर , योगेश ठाकरे,नकुल ठाकरे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments