प्रतिनिधी l शिंदखेडा : शेतकरी बोर्डिंग संस्थेच्या किसान विद्यालय व भडणे येथील कै. सी. बी. देसले विद्यालयात तब्बल ३० वर्षे ८ महिने प्रदीर्घ सेवा बजावून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक एस. एस. पवार यांचा सपत्नीक सत्कार सोहळा दि ८ ऑगस्ट शनिवारी क्रांती दिनाचे औचित्य साधत उत्साहात संपन्न झाला.
एस. एस. पवार यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विद्यार्थी, शिक्षक व संस्थेच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेच्या वतीने सपत्नीक प्रदीर्घ सेवा पूर्ण केल्यावर शाल, श्रीफळ व भेटवस्तू व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पवार यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात व शाळा प्रगतीत मोलाचे योगदानाचे कौतुक करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षण क्षेत्रात ३० वर्ष ८ महीने सेवा करणाऱ्या पवार यांच्या सेवापूर्ती सत्कार कार्यक्रमाला मुख्याध्यापक एस. ए. वाडिले तसेच भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच संस्थेच्या वतीने अध्यक्ष साहेबराव सरकार,उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, शालेय समितीचे चेअरमन भबुतराव देसले, सचिव प्रकाश पाटील यांनी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्यात.
प्रसंगी ज्येष्ठ अध्यापिका संगीता वेंदे, आर. एन. बैसाणे, सारंग पाटील, मनोहर पाटील, जितेंद्र अहिरे, निशांत शिंदे, निलेश पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सेवापूर्ती सत्कार समारंभात मुख्याध्यापक एस ए वाडिले,भाजपा शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, निशांत शिंदे,निलेश पाटील,श्रीमती मनीषा पवार यांनी मनोगत व्यक्त करून एस एस पवार यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. उपस्थितांनी त्यांना निरोगी, आनंदी व सुखी निवृत्ती जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस एस पवार यांनी शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना आलेले बरे वाईट अनुभव, आलेल्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले.सत्कार सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती अलका सूर्यवंशी, शरद पवार व निलेश पवार यांनी अनमोल सहकार्य केले. सूत्रसंचालन सारंग पाटील यांनी केले.
0 Comments